राज्य सरकारचा केला निषेध, एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला
प्रतिनिधी / सोलापूर
राज्य सरकारने पंढरपूरमध्ये संचारबंदी पुकारण्यात आले आहे. संचारबंदीच्या विरोधात सोलापूर शहरात चार हुतात्मा चौकात सायंकाळी साडेआठ वाजता सकल मराठा समाजातर्फे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची फाडून होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या सकल मराठा समाजाच्या, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई आक्रोश मोर्चा वर सरकारने बंदी घालून, पंढरपूर शहरात आज रात्री बारापासून संचारबंदी लागू केली असून, पंढरपूरकडे जाणारी सर्व एसटी वाहतूक. सरकारने दोन दिवस बंद ठेवली आहे. सरकारच्या या कृतीचा सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा व शहर च्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत शासनाच्या शासकीय आदेशाचे होळी करण्यात आली. यावेळी मराठा समाजाच्या बांधवांनी धिक्कार असो राज्य सरकारचा धिक्कार असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, भाऊ रोडगे, यासह विविध मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाची मुस्कटदाबी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार आपल्या न्याय व हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना. सरकार ज्याप्रकारे दडपशाही करत आहे. हे लोकशाहीला व स्वतंत्र भारताला शोभणारे नाही. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेमध्ये मराठा समाज सोडून सगळ्या समाजाला आरक्षण आहे. पण संघर्षाचा आमचा वारसा असून हे आंदोलन आरक्षण जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत असेच चालू राहिल. सरकारने आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य दाखवून. या आंदोलनावर ज्याप्रकारे बंदी घातली आहे. ही बाब अतिशय निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामधील छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे असून, आत्तापर्यंत आंदोलन आम्ही शांततेतच केले असून, यापुढे मात्र सरकार जर अशी वागणूक देणार असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल….!
माऊली पवार
समन्वयक, सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा.