रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती लवकरच जिल्हाधिकारी काढणार आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिह्यात कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून खबरदारीसाठी 7 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली होती. यामध्ये मुदतवाढ करण्यात असून 14 मार्चपर्यत ही संचारबंदी राहणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी शंभरकर लवकरच सुधारित आदेश काढतील असेही भरणे यांनी सांगितले.
इतर जिह्याच्या तुलनेत सोलापूर शहर जिह्यात कोरोनाचे प्रमाण कमी आहे मात्र आकडा वाढू नये म्हणून 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली होती. उद्या रविवार संचार बंदीचा शेवट दिवस असल्यामुळे पालकमंत्री भरणे यांना विचारले असता ते म्हणाले, रात्रीची संचारबंदी 14 मार्चपर्यंत राहील, सर्व नियम तेच राहणार असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर लवकरच आदेश काढतील.
कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातून आलेल्या नागरिकांना जर सोलापूर जिह्यात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटिव्ह टेस्टचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. कोरोनाचे प्रमाणपत्र नसल्यास सोलापूर जिह्यात प्रवेश मिळणार नाही
कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय सोलापूर शहर जिह्यात पूर्णपणे लॉकडाऊन होणार नाही, पण नागरिकांनी काळजी घ्यावी. 14 मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी वाढवली आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ. सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. -दत्तात्रय भरणे, पालकमंत्री |
हे राहणार नियम शाळा, महाविद्यालय 14 मार्चपर्यंत बंद, दहावी, बारावीचे दोन वर्ग सुरू राहणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास एक हजार रुपयाचा दंड क्रीडांगणावर 14 मार्चपर्यत क्रिकेट स्पर्धा बंद, गर्दीचे खेळ होणार नाही स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय यांना 50 टक्के सूट लग्नसमारंभात 50 नागरिक उपस्थित रहावे लागणार.\ हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंत चालू त्यानंतर चालू राहिल्यास कारवाई सर्व धार्मिक स्थळामध्ये 50 टक्के गर्दी, पंढरपूर -तीन हजार अक्कलकोट- दीड हजार सभा , कार्यक्रम, आंदोलनास राहणार बंदी एसटीमध्ये पन्नास टक्के सूट, सॅनिटायझर सोशल डिस्टनचे नियम पाळावे भाजीपाला विपेते, दुकानात मास्क, सॅनिटायझर वापरावे अन्यथा कारवाई शासकीय बैठक सभा, ऑनलाईन घ्या गर्दी करू नका पालकमंत्र्यांचे महापौरांना सूचना |