प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 7 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 2 पुरुष , 5 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 2 रुग्ण सारी रोगाचे आहे. एकाच दिवशी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 8 मृत आहेत. आज तीन रुग्ण तर आतापर्यंत 22 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 135 वर पोहचली असून उर्वरित 105 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली.
दरम्यान, आज मयत झालेली 26 वर्षीय महिला असून पाटकुल परिसरातील (ता.मोहोळ) आहे. दुसरी मयत न्यू पाच्छा पेठ येथील 65 वर्षाची महिला असून दि. 3 मेला या महिलेला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
आज 116 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 109 अहवाल निगेटिव्ह आले तर 7 अहवाल पॉझिटीव्ह आले. यातील नई जिंदगी 2, शास्त्रीनगर 1, न्यु पाच्छा पेठ1 , देगाव 1, भगतसिंग मार्केट गेनटल चौक 1, जोडभावी पेठ 1 असे एकूण 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. . केगाव येथील इन्स्टिट्यूशन कोरणटाईमधून आतापर्यंत 56 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. आज 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 2295
आयसोलेशन वार्डात – 2258
एकूण अहवाल प्राप्त : 2003
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 1868
आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 135अहवाल प्रलंबित- 255
बरे होऊन घरी गेले- 22
मृत : 0 8