आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३४८
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढतच असुन नागरिकांत घबराटीचे वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण ३१९ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ६२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ४० पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १७६ रॅपिड टेस्ट मध्ये २७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १४३ रॅपिड टेस्टमध्ये ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ३३ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ८३६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४९० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३४८ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील २७ कोरोनाबाधीत
गुजरगल्ली १ पुरुष कुंकू गल्ली ३ पुरुष, १ महिला शिवाजीनगर १ पुरुष, १ महिला जाधव प्लॉट १ पुरुष
बागवान नगर ५ पुरुष, ३ महिला मार्केट यार्ड १ पुरुष चांदगुडे गल्ली १ महिला राशीन पेठ १ पुरुष, १ महिला मेनरोड २ पुरुष, २ महिला कमलाई नगर १ पुरुष सिंचननगर १ महिला कानाडगल्ली १ पुरुष
ग्रामीण भागातील ३५ कोरोनाबाधीत
जेऊर ५ पुरुष पिंपळवाडी १ पुरुष कोळगाव १ पुरुष कुंभेज १ पुरुष, ३ महिला दाहींखिंडी १ पुरुष वीट ३ पुरुष, ५ महिला
साडे ३ पुरुष पोफळज १ पुरुष मोरवड १ पुरुष वांगी नं.१ (पुरुष) पांगरे १ पुरुष शेटफळ ४ पुरुष, ४ महिला