तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
कोरोना बाधित 2 महिला व 7 पुरुष अशा 9 जनांवर यशस्वी उपचार झाल्याने शनिवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैदकीय अधिकारी डॉ. औदुंबर मस्के यांनी शनिवारी दिली.
12 एप्रिल नंतर सोलापुरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. या पॉझिटिव्ह रुग्णावर सिविल हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. या रुग्णांच्या 5 व्या, 15व्या आणि 16व्या दिवशी अशा तीन टप्प्यात तीन चाचण्या घेतल्या जातात. यामधे 5व्या दिवशीची चाचणी पॉझिटिव्ह आली तरी त्यानंतरच्या 2 चाचण्या निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. त्यानूसार शनिवारी 2 महिला व 7 पुरुषांच्या उपचारादरम्यानच्या तिन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. ते बरे झाले आहेत. त्यामूळे त्यांना शनिवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले. तर यापूर्वी 10 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 2 मे पर्यंत एकून 19 रूग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर औदुंबर म्हस्के यांनी दिली.