तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 29 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 182 वर पोहचली असून उर्वरित 142 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दिली. दरम्यान आज कोरोनाने 11 वा बळी घेतला आहे.
मृत पावलेली 48 वर्षाची महिला न्यू पाच्छा पेठ परिसरातील होती. सहा मे रोजी तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असेही शंभरकर यांनी सांगितले. आज 126 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 97 अहवाल निगेटिव्ह आले तर 29 अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये 14 पुरुष ,15 स्त्रीचा समावेश आहे. यातील आकाशवाणी केंद्र जवळ 12, अलकुंटे चौक 2 , बापुजी नगर 4 , भारतरत्न इंदिरा नगर दोन , नई जिंदगी चार , रंग भवन परिसर एक , शनिवार पेठ 1, रेल्वे लाईन परिसर एक, न्यू पाच्छा पेठ 2 येथील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चार सारीचे रुग्ण आढळले आहेत. आज 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आज तीन पुरुष, दोन स्त्री असे पाच व्यक्ती आणि आतापर्यंत 29 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
आयसोलेशन वॉर्डात 2775 व्यक्ती असून त्यापैकी 2495 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 2313 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 280 अहवाल प्रलंबित आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 182 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळले असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 1955
आयसोलेशन वार्डात – 2775
एकूण अहवाल प्राप्त : 2495
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2313
आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 182
अहवाल प्रलंबित- 280
बरे होऊन घरी गेले- 29