ऑनलाईन टीम / सोलापूर :
सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता फैलावा रोखण्यासाठी आज पासून पुढील दहा दिवसांसाठी म्हणजेच 26 जुलैपर्यंत कडक लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.
सोलापूर शहरासह आजूबाजूच्या तीस गावातही कडक संचारबंदी असणार आहे. या संचारबंदी दरम्यान सोलापूर महानगर पालिका एकूण 25 हजार अँटीजन टेस्ट करणार आहे. तसेच या संचराबंदीत हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि दूध वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
- गाड्या जप्त करत कारवाईला सुरुवात
या संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सोलापूर सोबतच चंद्रपूर आणि सातारा जिल्ह्यात देखील पुढील दहा दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.