तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर शहारात गूरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत 83 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी दिली.
सोलापुर शहरात गूरुवारी 260 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 83 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 177 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 83 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 49 पुरुषांचा तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2080 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने 31 जणांना घरी सोडण्यात आले.
———-
– एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 11148
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2080
– आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 228
– रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 762
– रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1090
– प्राप्त तपासणी अहवाल : 11148
– प्रलंबित तपासणी अहवाल : 00
– निगेटिव्ह अहवाल : 9068