प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता चिंतेची बाब असून शनिवारी ग्रामीण भागात 20 तर शहरात 5 रुग्ण आढलेले आहेत. सदरची माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिले आहेत.
तर रविवारी तालुक्यातील किणी 1, सलगर 1, नागूर 2, नागणसूर 2 असे एकूण 6 तर शहरात शिवपार्वती नगर अक्कलकोट 1, अक्कलकोट शहर 2 असे एकूण 9 जण बाधित आढळलेले आहेत.
दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी ग्रामिण व शहरातील बाधितांची संख्या पाहता रोडावली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाकडून रात्रीचा दिवस होत असताना नागरिकांनी देखील प्रशासनास सहकार्य करावेत, घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या 15 दिवसातील सर्वात मोठी रुग्ण संख्या वाढलेली आहे. सदरची बाब ही चिंतेची असून कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सी. सी. सी. सेंटर्सची व्यवस्था विविध ठिकाणी होणे तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने आता पावले उचलावीत.