प्रतिनिधी / कुर्डुवाडी
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुर्डू ग्रामपंचायतीवर यंदा एकहाती वर्चस्व राखण्यात आण्णा ढाणे गटाला यश आले असून याठिकाणी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचा दारुण पराभव झाला असून केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे.
माढा तालुक्यातील आणि करमाळा मतदार संघातील कुर्डू या गावात सत्तांतर होत माजी जि.प. सदस्य अण्णासाहेब ढाणे यांच्या नागन्नाथ विकास आघाडीला १७ पैकी १६ जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांच्यासह त्यांचे भाऊ संदीप पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लगला आहे.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या लढतीत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांच्या शांतता व विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांच्या नागन्नाथ विकास आघाडीला १७ पैकी १६ जागांवर यश मिळाले आहे.
करमाळा मतदार संघातील मोठ्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणूकीत परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. संजय मामा शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे अण्णासाहेब ढाणे यांचा विजय झाला असून त्यांनी सतरा पैकी सोळा जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मागील वेळी पाटील यांच्या आघाडीची सत्ता होती यावेळी अण्णासाहेब ढाणे यांनी एकटे लढत आघाडी पुढे आव्हान उभे केले होते. त्याच्या निवडीबद्दल गावात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.