तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
आशा वर्करला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या ‘त्या’ बाधित महिलेच्या पतीची कोर्टाच्या आदेशाने जेलमध्ये रवानगी करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१४ रोजी सुधीर चोपडे यांच्या पत्नी या कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यांना डॉक्टर आणि ग्रामपंचायतीने कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर येथे जाण्यास सांगितले असता त्यांनी घरीच विलगीकरणात थांबत असल्याचे सांगितेले.दि.२१ रोजी स.९.३० डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार आशा वर्कर शोभा या सुधीरच्या पत्नीचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या त्यावेळी त्या घरी नसल्यामुळे आशा वर्कर शोभा यांनी सुधीरच्या मुलीची जबाबावर सही घेतली. हाच राग मनात धरून सुधीर चोपडे याने आशा वर्कर शोभा प्रवीण मेहता हिच्या घरी जाऊन मारहाण केली व तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली असल्याची फिर्याद आशा वर्कर शोभा प्रवीण मेहता यांलनी दि.२२ रोजी कुर्डुवाडी पोलिसांत दिली होती. त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांनी सुधीर चोपडे यास अटक करुन कोर्टासमोर हजर केले असता.कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली.अशा प्रकारे जर कोणी कायदा हातात घेऊन सरकारी कार्यात अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल असे सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी सांगितले.