वार्ताहर पंढरपूर
पंक्चर झालेल्या कारचे टायर खोलत असताना पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने तुंगत ता.पंढरपूर येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे येथील सुयोग हॉटेल जवळ रविवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारंग प्रकाश रणदिवे (रा. तुंगत ता. पंढरपूर) संजय विठ्ठल अमंगे (रा.मानेवाडी ता.मंगळवेढा,सध्या रा.तुंगत ता.पंढरपूर) हे कारने (एम.एच.13 ए.झेड – 7234) लातूर येथून तुंगतकडे येत होते. यादरम्यान बाळे येथील सुयोग होटेल जवळ त्यांची कार पंक्चर झाली. कारचे टायर खोलत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक कंटेनरने (सीजी.04 एमपी 1457) कार शेजारी उभे असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदरच्या घटनेने तुंगत व मानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दोन युवक गेल्याने गावक-यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.