प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात भयभित वातावरण तयार झाले असून तालुक्यात 123 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5810 झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचीसंख्या 98 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या चार हजार 839 आहे तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 873 असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी संगीतले आहे.
सोमवारी आलेल्या अहवालानुसार शहरात 16 तर ग्रामीण भागात 107 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. करमाळा शहरात 1302 तर ग्रामीण भागात 4508 कोरोना बाधित रुग्ण आहेत.मृत्यू झालेल्या संख्यामध्ये ग्रामीण भागातील 78 तर शहरातील 20 रुग्णांचा समावेश असल्याचे डॉ. जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 80 जण करमाळा शहरातील तर ग्रामीण भागातील 793 जण असल्याचेही जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी जाधव यांनी म्हटले आहे. ही माहिती रविवारी रात्री एक वाजेपर्यंतची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.