प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण २३० रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ३१ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे.आज करमाळा शहरातील संख्येत वाढ होत आहे. करमाळा शहरात घेण्यात आलेल्या ११५ रॅपिड टेस्ट मध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये अर्बन बँक मेनरोड -५ (४ पुरूष आणि १ महिला)मेनरोड -३ पुरूष आणि १ महिला)
कृष्णाजीनगर -५ (२ पुरूष आणि ३ महिला)
गुजरगल्ली -१ (१ महिला)
भवानीपेठ -४ (३ पुरूष आणि १ महिला)
शिवाजीनगर -१ (१ पुरूष) रंभापूरा -२ (१ पुरूष आणि १ महिला,सुतार गल्ली -१ (१ पुरूष)गणेश नगर -१ (१ पुरूष) डवरी गल्ली -१ (१ पुरूष) यामध्ये तर ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या ११५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
ग्रामीण भागात वीट -१ (१ पुरूष) देवीचामाळ -२ (२ पुरूष) उमरड -२ (१ पुरूष आणि १ महिला) जेऊर -२ (१ पुरूष आणि १ महिला) गुळसडी -३ (१ पुरूष आणि २ महिला वाघाचीवाडी -१ (१ पुरूष) पांडे -१ (१ पुरूष) पोथरे -१ (१ महिला)रावगाव -१ (१ पुरूष) ढोकरी -१ (१ पुरूष) कोंढेज -१ (१ पुरूष)
केम -४ (३ पुरूष आणि १ महिला) कोर्टी -१ (१ महिला) वाशिंबे -२ (१ पुरूष आणि १ महिला वंजारवाडी -२ (२ महिला) जवळा -१ (१ पुरूष) देवळाली -१ (१ महिला)जातेगावं -१ (१ पुरूष)आळसुंदे-१ (१ पुरूष)
आज ४५ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ६४६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहेत. सध्या ४१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०८५ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता वावरत असल्याने यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे .
Previous Articleशिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना कोरोनाची लागण
Next Article टेस्लाच्या एलॉन मस्कना मोठा झटका
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.