प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथील के.एन. भिसे महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला. या मध्ये गेल्या पंचवीस वर्षांटत केलेल्या कार्याचा व उपक्रमाचा फार मोठा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये विज्ञान शाखा सुरू करणे, मुलींचे वसतिगृह सुरू करणे, परिसर विकसित करणे, क्रीडांगण विकसित करणे, एन सी सी ची उत्कृष्ट कामगिरी, इमारती बांधकाम, इनडोअर स्टेडियम, वृक्षारोपण इत्यादी मुळेच महाविद्यालयास हा बहुमान मिळाला आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ. विनायकराव पाटील , सचिव शामसुंदर भिसे ,प्रा प्राचार्य डॉ.आर .आर .पाटील सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.