प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात आज, दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे माढा रस्त्यालगतचे चिंचेचे झाड उन्मळून शिवदास दशरथ गोरे यांच्या राहत्या घरावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच भांबुरे वस्ती भोसरे ता.माढा येथील घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे किराणा व घरगुती साहित्याचे नुकसान झाले.
तर,भोसरे हद्दीतील भांबुरेवस्ती मधील ट्रक चालक अफसर शेख यांच्या राहत्या घरावरील तीन खोल्यांवरचे सर्व पत्रे उडून गेल्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य व रमजान सणासाठी आणलेला किराणा साहित्य भिजून सुमारे ५० हजाराहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या वादळी पावसामुळे गारवा मिळाला असला तरी काही ठिकाणी नुकसान झाले. तर शेतकर्यांची ताराबंळ उडाली.