संशयिताची गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी / सोलापूर
मड्डी वस्ती येथे चुलत्याने चुलत पुतण्यावर कुर्हाडीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. यानंतर संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत निमेश मार्तंड गजधाने (वय 44, रा. गुजर वस्ती, रविवार पेठ) यांनी फिर्यादी दिली. त्यावरून राजू अमृता गजधाने (रा. मड्डी वस्ती) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कामावर असताना त्यांचे चुलत चुलते राजू गजधाने यांनी फोन करून फिर्यादीस घरी बोलावून घेतले. त्यावेळी ते घरी एकटीच बसले होते. फिर्यादी तेथे गेल्यानंतर फिर्यादीने मला कशासाठी बोलावले अशी विचारणा केली, त्यावेळी त्याने फिर्यादीस माझी पत्नी मुलीला घेऊन मला सोडून माहेरी गेली आहे.
त्यामुळे मी तणावात आहे असे सांगितले. तेव्हा फिर्यादीने त्यास तू तणाव घेऊ नको, सर्व काही ठीक होईल असे समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने कुर्हाडीच्या तुंब्याने फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारून खुनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर आरोपी राजू याने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम करीत आहेत.