-पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या मृत्यूने शोककळा
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्मयातील केगांव बु. या गावात शेतकऱयांचे मोटार रिवाडिंग करणाऱया इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई (वय 27) आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई (वय 25) यांचा काल रात्री पुण्यातील काळेवाडी फाटा येथे तोल जाऊन दुचाकीचा दुभाजकाला जोरात टक्कर दिल्याने अपघाती मृत्यू झाला. ही घटना काल रात्री 11-45 ला पुणे येथे घडली. सोलापूर जिह्यातील अनेक मुलं हाताला काम मिळावं या हेतूने आपल्या आई वडिलांना, आपल्या गावाला सोडून कामासाठी पुण्याला जातात. त्यातलीच हे दोन तरुण, 27 वयाचा पंकज देसाई आणि अवघ्या 25 वयाचा राहुल देसाई.
महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन पडल्याने पुण्यात काम करणाऱया या मुलांना कंपनीने सुटÎा दिल्या. कंपनी बंद, मेस बंद मग या मुलांनी करावं काय? पर्याय एकचं लॉकडाऊन हटेपर्यंत आपल्या गावाकडे जावं. याचं पर्यायाचा विचार करून काल पंकज देसाई आणि राहुल देसाई हे तरुण कंपनीच्या कामावरून आल्यावर गावाकडं निघाली. आपल्या गावाकडे येणाऱया या दोन मुलांवर रात्री काळाने घाला घातला आणि ती कायमची आई वडिलांची कुशी सोडून देवाच्या कुशीत विसावली.
केगांव मधील तरुणामध्ये नेहमी मिसळणाऱया पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत भावंडांच्या मृत्यूने अख्य गावं शोक सागरात बुडाली आहे. सर्व तरुण बैचेन झाली आहेत. पुण्यावरून निघताना घरच्यांशी आणि गावातील काहीं मित्रांशी या मुलांनी गावाकडे येत असल्याबद्दल रात्री फोनवरून संभाषण साधली होती. रात्री चांगल्या बोललेल्या मित्राची बातमी काही तासात अशी येईल असे वाटले नव्हते. लहान वयात अर्ध्यावर डाव मोडल्याने हृदयद्रावक घटनेने मित्रमंडळीसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
पंकज देसाई याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे, तर राहुल देसाई याच्या पश्चात फक्त त्याचे दुर्दैवी वडील आणि दोन बहिणी आहेत.