तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात सोमवारी 144 कोरोनाबाधित रूग्ण आढळले तर तीन जणांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये 152 रुग्ण आढळले. तर सातजणांचा मृत्यू झाला. शहर आणि जिह्यातील एकूण रुग्ण संख्या 7, 679 एवढी झाली.
सोलापूर शहरात सोमवारी 3,047 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 144 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2903 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 144 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 67 पुरुष तर 77 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4,707 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 30745
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 4707
प्राप्त तपासणी अहवाल 30487
प्रलंबित तपासणी अहवाल 258
निगेटिव्ह अहवाल 25780
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 348
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या 1500
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या 2859
ग्रामीण भागात सोमवारी 152 कोरोनाबाधित रुग्णांची भर
सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात सोमवारी 152 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 95 पुरुष, 57 स्त्रियांचा समावेश आहे. आज 7 तर आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 2972 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1285 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी सोमवारी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1352 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1200 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 152 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 2972 रुग्णांपैकी 1822पुरुष 1150 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1605 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट 442, मंगळवेढा 83
बार्शी 701, माढा 127
माळशिरस 142, मोहोळ 206
उत्तर सोलापूर 228, करमाळा 80, सांगोला 45
पंढरपूर 394, दक्षिण सोलापूर 524
एकूण 2972
होम क्वॉरंटाईन – 3568
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 23069
प्राप्त अहवाल- 22963
प्रलंबित अहवाल- 106
एकूण निगेटिव्ह – 19,992
कोरोनाबाधितांची संख्या- 2,972
रुग्णालयात दाखल – 1285
आतापर्यंत बरे – 1605
मृत – 82