प्रतिनिधी / कुर्डुवाडी
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन येथील कोविड सेंटरमधून १५ कोरोनाबाधितांनी मागच्या दाराने पलायन केले असल्याची फिर्याद दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिली आहे.
माढा तालुक्यातील कोरोनाबाधीतांना भोसरे ता. माढा येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करुन उपचार केले जातात. दरम्यान दि.१३ आॅगस्ट च्या दु.४ वा. पासून ते १६ ऑगस्ट च्या दु.१२.३० वा दरम्यान भोसरे ता.माढा येथे सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमधून नाडी ता.माढा येथील तीन कोरोनाबाधित रुग्ण,बादलेवाडी येथील एक,पिंपळनेर येथील दोन,कुर्डू येथील एक,पिंपळखुंटे येथील दोन,पडसाळी येथील पाच ,तडवळे येथील एक असे एकूण १५ जणांनी इतरांच्या जीवितास सदर रोगाचा संसर्ग होऊन संसर्ग पसरण्याचा संभव माहित असताना देखील ते पळून गेले आहेत. इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे.