प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूरमध्ये कोविड संशयित रुग्णांना पोलीस प्रक्षिशण केंद्र, केगाव येथे क्वॉरंटाईन केले जाते. आज नाताळ सणानिमित्त त्यांना सण साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून व त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी क्वारंटाईन मधील व्यक्तींसोबत ख्रिसमस सण साजरा केला.
आम आदमी पार्टीच्यावतीने शहरात विविध उपक्रम राबवित असतात. नाताळ सणानिमित्त तिथे असलेल्या व्यक्तींना सण साजरी करता येत नसल्यामुळे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. तेथील रुग्णांसोबत एकापेक्षा एक नृत्य, गाणे गाऊन त्यांना मंत्रमुग्ध केले, गप्पा गोष्टी करून समुपदेशन सुद्धा करण्यात आले. तसेच ख्रिसमसचे गाणे गाऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळेस आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अस्लम शेख, शिक्षण आणि विद्यार्थी समिती रॉबर्ट गौडर, कलाकार समिती आसीफ शेख, युवाध्यक्ष निहाल किरनळ्ळी आणि जेकब इंदिगिरी उपस्थित होते.