तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 960 वर पोहोचल्याने वाटचाल हजाराकडे सुरु असून, मंगळवारी शहरात फक्त आठ, तर ग्रामीण भागात 61 रुग्ण आढळले. शहरात तिघांचा, तर ग्रामीणमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शहरात 68 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
ग्रामीण भागात मंगळवारी 61 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 35 पुरुष, 26 स्त्रियांचा समावेश आहे. आज 1 तर आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 506 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यात नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. आज 389 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 328 अहवाल निगेटिव्ह, तर 61 पॉझिटिव्ह आढळले. 960 रुग्णांपैकी 611 पुरुष, 349 महिला आहेत. आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 415 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरामधील संख्या
एकूण तपासणी- 16 हजार 192
पॉझिटिव्ह अहवाल- 3 हजार 345
निगेटिव्ह अहवाल- 12 हजार 599
प्रलंबित अहवाल-288
बरे झालेले- 1 हजार 841
एकूण मृत्यू-306
ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट – 160
मंगळवेढा- 5
बार्शी – 213
माढा- 27
माळशिरस – 15
मोहोळ- 54
उत्तर सोलापूर – 102
करमाळा- 13
सांगोला – 6
पंढरपूर 57
दक्षिण सोलापूर – 308
एकूण – 960
आजपर्यंत तपासणी- 6 हजार 894
प्राप्त अहवाल- 6 हजार 823
प्रलंबित अहवाल- 71
एकूण निगेटिव्ह – 5 हजार 864
कोरोनाबाधितांची संख्या- 960
रुग्णालयात दाखल – 506
आतापर्यंत बरे – 415
मृत – 39