प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 162 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 150 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 12 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 8 पुरुषांचा तर 4 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 161 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 2434
पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 161
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 11
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 81
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 69
प्राप्त तपासणी अहवाल : 2328
प्रलंबित तपासणी अहवाल : 106
निगेटिव्ह अहवाल : 2168