प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज 152 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 92 पुरुष, 60 स्त्रियांचा समावेश आहे. एकाच दिवशी 141 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आज 6 तर आतापर्यंत 941 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 31 हजार 727कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 789 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2951 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2799 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 152 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 941 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 28 हजार 997 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1141
मंगळवेढा- 1432
बार्शी – 5730
माढा- 3288
माळशिरस – 5514
मोहोळ- 1577
उत्तर सोलापूर – 738
करमाळा- 2045
सांगोला – 2480
पंढरपूर 6341
दक्षिण सोलापूर – 1441
एकूण – 31,727
होम क्वांरटाईन – 8832
एकूण तपासणी व्यक्ती- 257058
प्राप्त अहवाल- 257017
प्रलंबित अहवाल- 4
एकूण निगेटिव्ह – 225291
कोरोनाबाधितांची संख्या- 31,727
रुग्णालयात दाखल – 1789
आतापर्यंत बरे – 28, 997
मृत – 941