तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज 134 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 94 पुरुष, 40 स्त्रियांचा समावेश आहे. आज 5 तर आतापर्यंत 922 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 31 हजार 155 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2682 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2548 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 134 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 922जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 28 हजार 521 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1129
मंगळवेढा- 1412
बार्शी – 5678
माढा- 3207
माळशिरस – 5397
मोहोळ- 1527
उत्तर सोलापूर – 728
करमाळा- 2034
सांगोला – 2442
पंढरपूर 6177
दक्षिण सोलापूर – 1424
एकूण – 31,155
होम क्वांरटाईन – 4227
एकूण तपासणी व्यक्ती- 246119
प्राप्त अहवाल- 246088
प्रलंबित अहवाल- 31
एकूण निगेटिव्ह – 214934
कोरोनाबाधितांची संख्या- 31,155
रुग्णालयात दाखल – 1712
आतापर्यंत बरे – 28, 521
मृत – 922