तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 2 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 2 स्त्रियांचा समावेश आहे. तर आज 25 आतापर्यंत 31 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 82 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सोमवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये जामगाव तालुका बार्शी 1 स्त्री, तालुका दक्षिण सोलापूर मधील नवीन विडी घरकुल एक स्त्री इतके रुग्ण आढळले आहेत. आज 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2 पॉझिटीव्ह तर 6 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 65 अहवाल प्रलंबित आहेत. 82 रुग्णांपैकी 53 पुरुष 29 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 8
बार्शी – 19
माढा- 7
माळशिरस – 2
मोहोळ- 4
उत्तर सोलापूर – 2
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 30
एकूण – 82
कोव्हीड 19 तालुकानिहाय माहिती
होम क्वांरटाईन – 2783
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 1631
प्राप्त अहवाल- 1566
प्रलंबित अहवाल- 65
एकूण निगेटिव्ह – 1485
कोरोनाबाधितांची संख्या- 82
रुग्णालयात दाखल – 45
आतापर्यंत बरे – 31
मृत – 6