तरुण भारत संवाद सोलापूर , प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी 20 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 12 पुरुष, 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज तिघाचा मृत्यू तर आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 607 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी बुधवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण बेलाटी तालुका उत्तर सोलापूर एक , एकरूख तालुका उत्तर सोलापूर एक, मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर, भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर, बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर, वाकी घेरडी तालुका सांगोला , रिधोरे तालुका माढा एक , दगड अकोले तालुका माढा तीन , रुक्मिणीनगर पंढरपूर , नाईकवाडी वस्ती मोहोळ, आष्टी तालुका मोहोळ ,कामती तालुका मोहोळ, विरवडे तालुका मोहोळ, पिंपळगाव ढगे तालुका बार्शी, वैराग तालुका बार्शी दोन , स्टेशन रोड अक्कलकोट, बुधवार पेठ अक्कलकोट प्रत्येकी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 167 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 147 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 20 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 607 रुग्णांपैकी 387 पुरुष 220 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 270 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 118
मंगळवेढा- 1
बार्शी – 113
माढा- 16
माळशिरस – 6
मोहोळ- 33
उत्तर सोलापूर – 63
करमाळा- 6
सांगोला – 5
पंढरपूर 33
दक्षिण सोलापूर – 213
एकूण – 607
होम क्वांरटाईन – 1826
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 5225
प्राप्त अहवाल- 5177
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 4571
कोरोनाबाधितांची संख्या- 607
रुग्णालयात दाखल – 307
आतापर्यंत बरे – 270
मृत – 30