तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी १७ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये १४ पुरुष, ३ स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ३६१ कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण बानेगाव तालुका उत्तर सोलापूर एक, तिऱ्हे तालुका उत्तर सोलापूर २, मार्डी तालुका उत्तर सोलापूर एक, गाताडे प्लॉट पंढरपूर एक, भक्तनिवास पंढरपूर एक, रुक्मिणी नगर पंढरपूर एक, घोडके गल्ली पंढरपूर एक, औदुंबर पाटील नगर पंढरपूर एक, नवी पेठ पंढरपूर एक, जुनी पेठ पंढरपूर एक, क्रांतीनगर मोहोळ दोन, मेहबूब नगर मोहोळ एक, नागनाथ गल्ली मोहोळ १, जेऊरवाडी तालुका अक्कलकोट एक, बोरगाव तालुका अक्कलकोट एक,
या क्षेत्रात आढळले रुग्ण
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज १२९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ११२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १७ पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. ३६१ रुग्णांपैकी २२६ पुरुष १३५ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज १२ तर एकूण १४२ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट ६९, बार्शी ५१
माढा ८, माळशिरस ५,
मोहोळ २१ उत्तर सोलापूर २८,
करमाळा १, सांगोला ३
पंढरपूर १६, दक्षिण सोलापूर १५९
एकूण ३६१
होम क्वांरटाईन १७२५
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती ३८०७
प्राप्त अहवाल ३७७३
प्रलंबित अहवाल ३४
एकूण निगेटिव्ह ३४१३
कोरोनाबाधितांची संख्या ३६
रुग्णालयात दाखल २०२
आतापर्यंत बरे १४२