तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज मंगळवारी 96 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 200 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 96 पैकी 68 पुरुष, 28 स्त्रियांचा समावेश आहे. आज 1 तर आतापर्यंत 1041 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 578 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1375 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1279 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 96 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1041 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32 हजार 888 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट 1158, मंगळवेढा 1610, बार्शी 6275, माढा 3742, माळशिरस 6486, मोहोळ 1742, उत्तर सोलापूर 783, करमाळा 2188, सांगोला 2755, पंढरपूर7319, दक्षिण सोलापूर – 1520, एकूण 35, 578
होम क्वांरटाईन – 12009
एकूण तपासणी व्यक्ती- 328463
प्राप्त अहवाल- 328422
प्रलंबित अहवाल- 41
एकूण निगेटिव्ह – 292845
कोरोनाबाधितांची संख्या- 35,578
रुग्णालयात दाखल – 1649
आतापर्यंत बरे – 32,888
मृत – 1041