प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरूवारी नव्याने 45 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 29 पुरुष, 16 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 जणांचा मृत्यू तर आतापर्यंत 14 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आज 1 तर आतापर्यंत 96 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 260 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी गुरूवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर1, मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर 2, हिंगणी निपाणी तालुका मोहोळ, हिरज तालुका उत्तर सोलापूर, पाकणी तालुका उत्तर सोलापूर , तिरे तालुका उत्तर सोलापूर प्रत्येकी 1, तालुका बार्शी 2 , पारधी वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर एक, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 21, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर 1, गुरव वाडी तालुका अक्कलकोट एक, होटकर गल्ली अक्कलकोट एक, बुधवार पेठ अक्कलकोट चार , नवीन पोलीस वसाहत बार्शी 2 , उपळाई ठोंगे तालुका बार्शी 4, म्हाडा कॉलनी बार्शी 1 याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज 80 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 45 पॉझिटीव्ह तर 35 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 34 अहवाल प्रलंबित आहेत. 260 रुग्णांपैकी 161 पुरुष 99 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 96 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 46
बार्शी – 39
माढा- 7
माळशिरस – 5
मोहोळ- 14
उत्तर सोलापूर – 18
करमाळा- 1
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 120
एकूण – 260
होम क्वांरटाईन – 223
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 3068
प्राप्त अहवाल- 3034
प्रलंबित अहवाल- 34
एकूण निगेटिव्ह – 2775
कोरोनाबाधितांची संख्या- 260
रुग्णालयात दाखल – 150
आतापर्यंत बरे – 96
मृत – 14