तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 43 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 27 पुरुष, 16 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 520 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शनिवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण बार्शी, माळशिरस दक्षिण सोलापूर, अक्कलकोट ,पंढरपूतर मंगळवेढा तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. सांगोला तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 191 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 148 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 43 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत . 520 रुग्णांपैकी 332 पुरुष 188 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 195 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 97
मंगळवेढा- 1
बार्शी – 95
माढा- 11
माळशिरस – 6
मोहोळ- 26
उत्तर सोलापूर – 49
करमाळा- 4
सांगोला – 4
पंढरपूर 25
दक्षिण सोलापूर – 202
एकूण – 520
होम क्वांरटाईन – 1737
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 4686
प्राप्त अहवाल- 4645
प्रलंबित अहवाल- 41
एकूण निगेटिव्ह – 4026
कोरोनाबाधितांची संख्या- 520
रुग्णालयात दाखल – 301
आतापर्यंत बरे – 195
मृत – 24