तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज रविवारी 102 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 102 पैकी 72 पुरुष, 30 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 1055 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 36 हजार 263 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 541 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2245 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2143 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 102 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1055 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 33 हजार 667 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट1162, मंगळवेढा 1647, बार्शी 6354,
माढा-3811,माळशिरस – 6636, मोहोळ-1761
उत्तर सोलापूर – 797, करमाळा-2264, सांगोला 2829,
पंढरपूर7472, दक्षिण सोलापूर – 1530
एकूण -36, 263
होम क्वांरटाईन – 2846
एकूण तपासणी व्यक्ती- 340486
प्राप्त अहवाल- 340445
प्रलंबित अहवाल- 41
एकूण निगेटिव्ह – 304183
कोरोनाबाधितांची संख्या- 36,263
रुग्णालयात दाखल – 1541
आतापर्यंत बरे – 33,667
मृत – 1055