आज 95 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 30,772 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
2420 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज 95 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 57 पुरुष, 38 स्त्रियांचा समावेश आहे. आज 5 तर आतापर्यंत 917 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 30 हजार 772 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 420 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1603 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1508 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 95 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 917 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 27 हजार 435 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट 1073, मंगळवेढा- 1405, बार्शी 5467, माढा-3183,
माळशिरस – 5373, मोहोळ -1524, उत्तर सोलापूर – 726,
करमाळा- 2029, सांगोला 2433, पंढरपूर6141, दक्षिण सोलापूर – 1418,
एकूण 30, 772
होम क्वांरटाईन – 4214
एकूण तपासणी व्यक्ती- 243406
प्राप्त अहवाल- 243372
प्रलंबित अहवाल- 34
एकूण निगेटिव्ह – 212601
कोरोनाबाधितांची संख्या- 30,772
रुग्णालयात दाखल – 2420
आतापर्यंत बरे – 27, 435
मृत – 917