तरुण भारत सवांद, प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी नव्याने ११ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये ४ पुरुष, ७ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज २ तर आतापर्यंत ८९ रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण २१५ कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये पाकणी तालुका उत्तर सोलापूर १, बीबीदारफळ तालुका उत्तर सोलापूर १, अक्कलकोट तालुक्यातील बुधवार पेठ २, मैंदर्गी १, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर १, कर्देहल्ली तालुका दक्षिण सोलापूर २, क्रांतीनगर मोहोळ २, वाळूज तालुका मोहोळ याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज ९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ११ पॉझिटीव्ह तर ८४ अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप ३५ अहवाल प्रलंबित आहेत. २१५ रुग्णांपैकी ७१पुरुष ४४ स्त्रियांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८९ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट ४०, बार्शी ३०
माढा ०७, माळशिरस ०५
मोहोळ १३, उत्तर सोलापूर १५
करमाळा ०१, सांगोला ०३
पंढरपूर ०७, दक्षिण सोलापूर ९४
एकूण २१५
होम क्वांरटाईन २२८३
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती २८६९
प्राप्त अहवाल २८३४
प्रलंबित अहवाल ३५
एकूण निगेटिव्ह २६२०
कोरोनाबाधितांची संख्या २१५
रुग्णालयात दाखल ११५
आतापर्यंत बरे ८९
मृत ११