जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्याच्या ब्रेक द चैनच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय हद्द वगळून 21 मेच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जूनच्या सकाळी सात पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
सर्व किराणा दुकाने सर्व किरकोळ व ठोक विक्रेते सर व इतर व्यवसाय करणारे व्यापारी ,दुकाने आस्थापने बंद राहतील. सर्व किराणामाल, भाजीपाला, फळ विक्री व पाळीव प्राण्यांचे खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी सात ते अकरा या कालावधीत घरपोच सुविधा देण्यास मुभा राहील, कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित सर्व सेवा केंद्र सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू राहतील.
उपहारगृह लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट ,मॉल, बाजार मार्केट बंद राहतील, वाईन शॉप, बिअर शॉप ,देशी दारू दुकाने आस्थापने बंद राहतील, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी विक्री बंद असणार, सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, नाट्यगृहे व सभागृह बंद राहतील. केशकर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर बंद राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.