आज 223 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 28, 026 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
4442 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 244 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सोमवारी 223 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 136 पुरुष, 87 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 771 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 026कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 442 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1406 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1183 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 223 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 771 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 22 हजार 813 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट 1052, मंगळवेढा-1304, बार्शी 5102, माढा- 2884, माळशिरस – 4761, मोहोळ-1247, उत्तर सोलापूर – 708, करमाळा-1984, सांगोला 2177, पंढरपूर5514, दक्षिण सोलापूर – 1293, एकूण -28, 026
होम क्वांरटाईन – 3089
एकूण तपासणी व्यक्ती 211659
प्राप्त अहवाल- 211614
प्रलंबित अहवाल- 46
एकूण निगेटिव्ह – 183588
कोरोनाबाधितांची संख्या- 28,026
रुग्णालयात दाखल – 4442
आतापर्यंत बरे – 22,813
मृत – 771