तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज बुधवारी 121कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 77 पुरुष, 44 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 852 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 248 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 312 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1763जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1642 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 121 पॉझिटिव्ह आढळल्या आहे.आतापर्यंत 852 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 25 हजार 214 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट 1065, मंगळवेढा- 1346, बार्शी 5244, माढा 2980, माळशिरस – 5067,
मोहोळ 1329,उत्तर सोलापूर – 716, करमाळा- 2000, सांगोला 2335, पंढरपूर 5779, दक्षिण सोलापूर – 1387
एकूण 29, 248
होम क्वांरटाईन – 4166
एकूण तपासणी व्यक्ती- 225652
प्राप्त अहवाल- 225613
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 196366
कोरोनाबाधितांची संख्या- 29,248
रुग्णालयात दाखल – 3312
आतापर्यंत बरे – 25,214
मृत – 852