तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी 25 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 19 पुरुष, 6 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा मृत्यू तर आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 557कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.डी बागडे यांनी सोमवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण तिर्हे तालुका उत्तर सोलापूर 2 , पाकणी तालुका उत्तर सोलापूर 2, हिरज तालुका उत्तर सोलापूर 2 , तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर एक, नवी पेठ पंढरपूर एक, सह्याद्री नगर पंढरपूर एक ,करकम तालुका पंढरपूर एक, करकम तालुका पंढरपूर एक, बुधवार पेठ मोहोळ एक, सिकंदर टाकळी तालुका मोहोळ एक, नवीन विडी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर एक, वळसंग तालुका दक्षिण सोलापूर एक, जिंती तालुका करमाळा दोन ,भवानी पेठ बार्शी एक, इंदिरा नगर कासारवाडी रोड बार्शी एक, सुतार नेट तानाजी चौक बार्शी एक, फुले प्लॉट परंडा रोड बार्शी एक, खांडवी तालुका बार्शी एक ,बाभूळगाव तालुका बार्शी एक, भारत गल्ली अक्कलकोट एक तालुका अक्कलकोट एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 100
मंगळवेढा- 1
बार्शी – 105
माढा- 11
माळशिरस – 6
मोहोळ- 28
उत्तर सोलापूर – 59
करमाळा- 6
सांगोला – 4
पंढरपूर 29
दक्षिण सोलापूर – 208
एकूण – 557
होम क्वांरटाईन – 1670
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 4775
प्राप्त अहवाल- 4740
प्रलंबित अहवाल- 35
एकूण निगेटिव्ह – 4184
कोरोनाबाधितांची संख्या- 557
रुग्णालयात दाखल – 308
आतापर्यंत बरे – 233
मृत – 26