तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी 260 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 207 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 9 हजार 716 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 932 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 260 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 672 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 260 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 167 पुरुष आणि 93 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9716 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 74032
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9716
प्राप्त तपासणी अहवाल : 73892
प्रलंबित तपासणी अहवाल : 140
निगेटिव्ह अहवाल : 64177
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 275
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2597
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 6844