जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात सोमवारी 519 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 324 पुरुष, 195 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 17 हजार 858 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 41 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2692 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2173 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 519 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 17 हजार 868 रुग्णांपैकी 10 हजार 943 पुरुष, 6 हजार 915 स्त्री आहेत. आतापर्यंत 504 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 11 हजार 313 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट 796
मंगळवेढा 849
बार्शी 3445
माढा 1728
माळशिरस 2436
मोहोळ- 805
उत्तर सोलापूर 595
करमाळा- 1249
सांगोला 1103
पंढरपूर 3703
दक्षिण सोलापूर – 1149
एकूण – 17, 858
होम क्वांरटाईन – 5899
एकूण तपासणी व्यक्ती- 139516
प्राप्त अहवाल- 139408
प्रलंबित अहवाल- 108
एकूण निगेटिव्ह – 121550
कोरोनाबाधितांची संख्या- 17, 858
रुग्णालयात दाखल – 6041
आतापर्यंत बरे – 11,313
मृत – 504
शहरात २८ रुग्णांची भर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 53 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 233 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 205 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 28 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 15 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7528 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 72322
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7528
प्राप्त तपासणी अहवाल : 72322
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 64794
एकूण मृतांची संख्या : 446
उपचारात असलेले 794
बरे झालेल्यांची संख्या 6288