प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी 59 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 35 पुरुष, 24 स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1172 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी गुरुवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस,मंगळवेढा तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 278 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 219अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 59 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 1172 रुग्णांपैकी 734 पुरुष 438 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 459 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाण
अक्कलकोट – 196
मंगळवेढा- 10
बार्शी – 236
माढा- 36
माळशिरस – 24
मोहोळ- 81
उत्तर सोलापूर – 123
करमाळा- 16
सांगोला – 7
पंढरपूर 9
दक्षिण सोलापूर – 351
एकूण – 1172
होम क्वांरटाईन – 2454
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 7759
प्राप्त अहवाल- 7675
प्रलंबित अहवाल- 84
एकूण निगेटिव्ह – 6504
कोरोनाबाधितांची संख्या- 1172
रुग्णालयात दाखल – 672
आतापर्यंत बरे – 459
मृत – 41