तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी 61 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 35 पुरुष, 26 स्त्रियांचा समावेश आहे. आज 1 तर आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 960 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 506 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी मंगळवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 389 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 328अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 61 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 960 रुग्णांपैकी 611पुरुष 349स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 415 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट – 160
मंगळवेढा- 5
बार्शी – 213
माढा- 27
माळशिरस – 15
मोहोळ- 54
उत्तर सोलापूर – 102
करमाळा- 13
सांगोला – 6
पंढरपूर 57
दक्षिण सोलापूर – 308
एकूण – 960
कोरोनाबाधितांची संख्या- 960
रुग्णालयात दाखल – 506
आतापर्यंत बरे – 415
मृत – 39