तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाच दिवशी 650 कोरोनामुक्त झालेले आहेत. आज शनिवारी 265 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 211 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 1597 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1332 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 265 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 151 पुरुष आणि 114 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9211 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 72005
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 9211
प्राप्त तपासणी अहवाल 71850
प्रलंबित तपासणी अहवाल 155
निगेटिव्ह अहवाल 62640
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 258
उपचारात 2473
बरे 6480