तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारी एकाच दिवशी 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 663 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 410 पुरुष, 253 स्त्रियांचा समावेश आहे. आज 13 तर आतापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 16 हजार 738 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 4068 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3405 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 663 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 16 हजार 738 रुग्णांपैकी 10 हजार 227 पुरुष, 6 हजार 511 स्त्री आहेत. आतापर्यंत 481 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 10 हजार 803 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट 770
मंगळवेढा 777
बार्शी 3280
माढा 1543
माळशिरस 2197
मोहोळ 748
उत्तर सोलापूर 571
करमाळा 1154
सांगोला 981
पंढरपूर 3591
दक्षिण सोलापूर 1126
एकूण 16, 738
होम क्वांरटाईन – 5991
एकूण तपासणी व्यक्ती- 132581
प्राप्त अहवाल- 132424
प्रलंबित अहवाल- 157
एकूण निगेटिव्ह – 115686
कोरोनाबाधितांची संख्या- 16, 738
रुग्णालयात दाखल – 5,454
आतापर्यंत बरे – 10, 803
मृत – 481