एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १३९ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार
६८ व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
मृत ११, एकूण बरे ६०
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने ६ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये ४ पुरुष, २ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आज २ तर आतापर्यंत ६० रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १३९ कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये नवीन विडी घरकुल १, भोजप्पा तांडा उत्तर सोलापूर १, लिंबी चिंचोळी १, हंजगी तालुका अक्कलकोट १, होटगी तालुका दक्षिण सोलापूर २ इतके रुग्ण आढळले आहेत. आज 53 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6 पॉझिटीव्ह तर 47 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप १४ अहवाल प्रलंबित आहेत. १३९ रुग्णांपैकी ८५ पुरुष ५४ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट17, बार्शी 20, माढा 7,
माळशिरस 4, मोहोळ 5,
उत्तर सोलापूर 11, सांगोला 3,
पंढरपूर 7, दक्षिण सोलापूर 65
एकूण 139
होम क्वांरटाईन – 2336
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2076
प्राप्त अहवाल- 2062
प्रलंबित अहवाल- 14
एकूण निगेटिव्ह – 1924
कोरोनाबाधितांची संख्या- 139
रुग्णालयात दाखल – 68
आतापर्यंत बरे – 60
मृत – 11