तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज मंगळवारी 84 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 152 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 84 पैकी 51 पुरुष, 33स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1063 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 36 हजार 431 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 421 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2385 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2301 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 84 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1063 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 33 हजार 947 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट1164, मंगळवेढा 1647, बार्शी 6397, माढा 3836, माळशिरस – 6666
मोहोळ 1768, उत्तर सोलापूर –797, करमाळा 2276, सांगोला 2836,
पंढरपूर7513, दक्षिण सोलापूर –1531, एकूण -36, 431
होम क्वांरटाईन – 11938
एकूण तपासणी व्यक्ती- 344159
प्राप्त अहवाल- 344101
प्रलंबित अहवाल- 58
एकूण निगेटिव्ह – 307671
कोरोनाबाधितांची संख्या- 36,431
रुग्णालयात दाखल – 1421
आतापर्यंत बरे – 33,947
मृत – 1063