तरुण भारत सवांद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये ६ पुरुष, ३ स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज ६ तर आतापर्यंत ६६ रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १४८ कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी बुधवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मैंदर्गी तालुका अक्कलकोट २,१, म्हाडा कॉलनी अक्कलकोट १, पिरजादे प्लॉट अक्कलकोट १, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय कुंभारी २, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर एक, बगले बरड सोलापूर रोड बार्शी २, इतके रुग्ण आढळले आहेत. आज ९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ९ पॉझिटीव्ह तर ८३ अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप २८अहवाल प्रलंबित आहेत. १४८ रुग्णांपैकी ९१ पुरुष ५७ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६६ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 21
बार्शी – 22
माढा- 7
माळशिरस – 4
मोहोळ- 5
उत्तर सोलापूर – 11
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 68
एकूण – 148
होम क्वांरटाईन – २४२५
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती – २१८२
प्राप्त अहवाल – २१५४
प्रलंबित अहवाल – २८
एकूण निगेटिव्ह – २००७
कोरोनाबाधितांची संख्या- १४८
रुग्णालयात दाखल – ७१
आतापर्यंत बरे -६६
मृत – ११