प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारीरी 104 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, एकाच दिवशी 115 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 104 पैकी 60 पुरुष, 44 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1081जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 36 हजार 840 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 111 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2989 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2885 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 104 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1081 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 34 हजार 648 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1176
मंगळवेढा- 1671
बार्शी – 6435
माढा- 3879
माळशिरस – 6765
मोहोळ- 1794
उत्तर सोलापूर – 803
करमाळा- 2327
सांगोला – 2861
पंढरपूर 7589
दक्षिण सोलापूर – 1540
एकूण – 36, 840
होम क्वांरटाईन – 11731
एकूण तपासणी व्यक्ती- 354779
प्राप्त अहवाल- 354722
प्रलंबित अहवाल- 57
एकूण निगेटिव्ह – 317884
कोरोनाबाधितांची संख्या- 36,840
रुग्णालयात दाखल – 1111
आतापर्यंत बरे – 34,648
मृत – 1081