प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज गुरुवारी 182 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 112 पुरुष, 71 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 795 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 577 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 101 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 978 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 796 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 182 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 795 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 23 हजार 681 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1057
मंगळवेढा- 1326
बार्शी – 5127
माढा- 2903
माळशिरस – 4858
मोहोळ- 1285
उत्तर सोलापूर – 710
करमाळा- 1993
सांगोला – 2273
पंढरपूर 5664
दक्षिण सोलापूर – 1381
एकूण – 28, 577
होम क्वांरटाईन – 3399
एकूण तपासणी व्यक्ती- 217198
प्राप्त अहवाल- 217106
प्रलंबित अहवाल- 92
एकूण निगेटिव्ह – 188530
कोरोनाबाधितांची संख्या- 28,577
रुग्णालयात दाखल – 4101
आतापर्यंत बरे – 23,681
मृत – 795