प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज सोमवारी 152 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 85 पुरुष, 67 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1040 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 482 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 754 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1144 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 992 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 152 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1040 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32 हजार 688 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1158
मंगळवेढा- 1607
बार्शी – 6270
माढा- 3735
माळशिरस – 6462
मोहोळ- 1738
उत्तर सोलापूर – 782
करमाळा- 2180
सांगोला – 2743
पंढरपूर 7290
दक्षिण सोलापूर – 1517
एकूण – 35, 482
होम क्वांरटाईन – 11973
एकूण तपासणी व्यक्ती- 327047
प्राप्त अहवाल- 327001
प्रलंबित अहवाल- 46
एकूण निगेटिव्ह – 291520
कोरोनाबाधितांची संख्या- 35,482
रुग्णालयात दाखल – 1754
आतापर्यंत बरे – 32,688
मृत – 1040